KHRIST PALANA SONG LYRICS MARATHI

Christians Lyrics
झुलवा गं झुलवा गं झुलवा गं
ख्रिस्त जन्मला दारी 
पाळणा झुलवा गं 

किती तेजस्वी हे रुप
लाजवी त्या सुर्यास
तेल गंधके घेउन येता
हसतो गालात

झुलवा गं झुलवा गं झुलवा गं
ख्रिस्त जन्मला दारी 
पाळणा झुलवा गं 

जो जो रे 
जो जो रे 
माझ्या ख्रिस्ता 
जो जो रे.

जो जो रे 
जो जो रे 
माझ्या राजा
जो जो रे 


स्वर्गदुत धरतीवरी
देइ ख्रिस्ताची महती
मेंढपाळ चालले गं भेटाया

रुप साजरं सुंदर 
जणु लखलखता प्रकाश
तारा तेजस्वी आज लगे चमकाया

स्वर्ग धरतीस भिडला
भेटाया ख्रिस्ताला
असा विक्रमी प्रतापि आज
राजा जन्मला

आज येरुशलमी गावा
जग उध्दारक जन्मला


झुलवा गं झुलवा गं झुलवा गं
ख्रिस्त जन्मला दारी 
पाळणा झुलवा गं 


जो जो रे 
जो जो रे 
माझ्या ख्रिस्ता 
जो जो रे.

जो जो रे 
जो जो रे 
माझ्या राजा
जो जो रे
To Top