येशू चा दरबार
येशू चा दरबार धन्य हा
येशू चा दरबार ||धृ ||
ज्येष्ठकनिष्टांवरी सारखा
एकाचा अधिकार निरंतर ||1||
एक शरीरी एकच आत्मा
करी आनंद विहार निरंतर ||2||
एक पुरे अधिकार असावा
अन्योनी सहकार निरंतर ||3||
ह्याच उपवनी प्रीतीलतेला
नटवी फलसंभार निरंतर ||4||